
About the Event
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अकोला आयोजित राज्यस्तरीय स्नेहमेळावा
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन व उपवर युवक युवती परिचय मेळावा, अकोला श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला यांच्या वतीने तसेच कुणबी समाजातील विविध समाज मंडळांच्या सहकार्याने राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन व उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक: रविवार, 29 नोव्हेंबर 2026 वेळ: सकाळी 9:00 वाजल्यापासून स्थळ: जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, सिंधी कॅम्प, अकोला या मेळाव्यामध्ये पुस्तक प्रकाशन, मान्यवरांचे स्वागत व सत्कार, उपवर युवक युवतींचा परिचय आणि स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. अनिल श्रीधरराव गावंडे, अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक मंडळ व सर्व आजीवन सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. समाजातील युवक युवतींना विवाहासाठी योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळावी, समाजबांधवांमध्ये स्नेहभाव वाढावा आणि समाजातील एकजूट अधिक दृढ व्हावी, हा या मेळाव्याचा उद्देश आहे. समाजातील सर्व उपवर युवक युवती, पालक, समाजबांधव आणि मान्यवरांनी या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. आपली उपस्थिती हीच आमची प्रेरणा! एकजूट समाजाची, प्रगती समाजाची!
Event Schedule
सकाळी 9:00 ते 10:00
चहा नाश्ता
सकाळी 10:00 ते 10:15
दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन
सकाळी 10:15 ते 10:45
मान्यवरांचे स्वागत व सत्कार
सकाळी 10:45 वाजता
उपवर युवक युवती परिचय
दुपारी 12:30 वाजल्यापासून
स्नेहभोजन
Event Photos
Organized by
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला सहआयोजक: श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, पुणे शाखा आणि रुख्मिणी कुणबी समाज महिला मंडळ, अकोला जिल्हा
- Schedule items
- 5
- Photo
- 1
More Events
See all eventsश्री विठ्ठल कुणबी समाज बहू. मंडळ अकोला च्या वतीने दसरा स्नेहमिलन मेळवा रोकडे मंगल कार्यालय अकोला येथे उत्साहात संपन्न...
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला यांच्या वतीने आयोजित दसरा स्नेहमिलन मेळावा रोकडे मंगल कार्यालय, अकोला येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात समाजबांधवांनी सहभागी होत एकोपा, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश दिला.
रोकडे मंगल कार्यालय अकोला12:3024October 2026
दसरा स्नेहसंमेलन मेळावा 2026
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, पुणे शाखेच्या वतीने आयोजित पहिला दसरा स्नेहसंमेलन मेळावा १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाने हा मेळावा संस्मरणीय ठरला. समाजाची एकजूट, युवक-युवतींना मार्गदर्शन आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला.
पुणे, महाराष्ट्र18October 2026
डॉक्टर व विधिज्ञ स्नेहसंमेलन सोहळा
डॉक्टर व विधिज्ञ स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमातून वैद्यकीय व कायदेविषयक क्षेत्रातील समाजबांधव एकत्र आले आणि स्नेह, एकोपा व सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
डॉ. सागरजी थोटे यांचे हॉस्पिटल, पाचवा माळा, राम नगर, अकोला.09:3023August 2026
