
About the Event
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ पुणे शाखा
🌼 श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, पुणे शाखा 🌼 🎉 दसरा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात संपन्न! 🎉 दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथे श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, पुणे शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पहिला दसरा स्नेहसंमेलन मेळावा अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या मेळाव्याला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे विचार मांडले. या सभेमध्ये विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून सहकार्य करण्याचे आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. हा आपल्या मंडळाचा पहिलाच दसरा स्नेहसंमेलन मेळावा होता. सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा मेळावा संस्मरणीय ठरला. यापुढेही वर्षभर समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून समाजातील बांधवांना एकत्र आणणे, युवक-युवतींना मार्गदर्शन करणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करणे, हा मंडळाचा मानस आहे. या उपक्रमाच्या आयोजनासाठी अकोला येथील श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला यांचाही सिंहाचा वाटा होता. त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे हा समाजहिताचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏💐 या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे, मान्यवरांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार! 🙏💐 📸 आजच्या कार्यक्रमातील काही छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिप्स आपल्यासोबत शेअर करत आहोत. 🤝 एकजूट समाजाची, प्रगती समाजाची!
Event Schedule
समाजबांधवांचे स्वागत व स्नेहसंमेलन , समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आपुलकीचा संवाद.
मान्यवरांचे मार्गदर्शन व मनोगत , समाजाच्या उन्नतीसाठी विचारांची देवाणघेवाण आणि मार्गदर्शन.
समाजहिताचा संकल्प व आभार प्रदर्शन, समाजाच्या एकजुटीसाठी आणि प्रगतीसाठी एकत्रित कार्य करण्याचा संकल्प.
Event Photos
Organized by
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, पुणे शाखा
- Schedule items
- 3
- Photos
- 8
More Events
See all eventsश्री विठ्ठल कुणबी समाज बहू. मंडळ अकोला च्या वतीने दसरा स्नेहमिलन मेळवा रोकडे मंगल कार्यालय अकोला येथे उत्साहात संपन्न...
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला यांच्या वतीने आयोजित दसरा स्नेहमिलन मेळावा रोकडे मंगल कार्यालय, अकोला येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात समाजबांधवांनी सहभागी होत एकोपा, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश दिला.
रोकडे मंगल कार्यालय अकोला12:3024October 2026
डॉक्टर व विधिज्ञ स्नेहसंमेलन सोहळा
डॉक्टर व विधिज्ञ स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमातून वैद्यकीय व कायदेविषयक क्षेत्रातील समाजबांधव एकत्र आले आणि स्नेह, एकोपा व सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
डॉ. सागरजी थोटे यांचे हॉस्पिटल, पाचवा माळा, राम नगर, अकोला.09:3023August 2026
व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर शेगाव येथे संपन्न झाले
विद्यार्थी, युवक आणि नवउद्योजकांना करिअर व व्यवसायाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणारे शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमातून उपस्थितांना व्यावसायिक क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास आणि करिअर नियोजनाबाबत उपयुक्त माहिती मिळाली.
पांडुरंग कृपा मंगल कार्यालय शेगांव10:3021June 2026
