
About the Event
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला यांच्या वतीने 'दसरा स्नेहमिलन मेळावा' मोठ्या उत्साहात संपन्न अकोला: समाजातील बंधुभाव वाढीस लागावा आणि सर्वांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, या उदात्त हेतूने श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला (रजि. नं. F-21908) व अकोला जिल्ह्यातील कार्यरत विविध कुणबी समाज मंडळांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दसरा स्नेहमिलन मेळावा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता, नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे, महसूल कॉलनी येथील रोकडे सभागृह येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी एक दिवस ही भावना मनात ठेवून अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो समाज बंधू आणि भगिनींनी आपली दैनंदिन कामे बाजूला सारून या मेळाव्याला ऐतिहासिक उपस्थिती दर्शवली. मान्यवरांची मांदियाळी आणि मार्गदर्शन: या दिमाखदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान कुणबी समाज विकास मंडळ, शेगाव (जि. बुलढाणा) चे अध्यक्ष मा. श्री. दयरामभाऊ वानखडे यांनी भूषवले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेलुरा येथील ह.भ.प. श्री. महेशजी महाराज मारवाडी आणि गुरुदेव सेवा आश्रम, पाटसुल येथील ह.भ.प. श्री. डॉ. शिवदास महाराज गाडेकर* लाभले होते. महाराजांनी आपल्या कीर्तनरूपी अमूल्य मार्गदर्शनातून समाज प्रबोधन करत उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख अतिथींची उपस्थिती: या प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मा. श्री. रामेश्वरभाऊ फुंडकर तसेच संत तुकाराम पतसंस्था (जळगांव जामोद) चे अध्यक्ष मा. श्री. रघुनाथजी कौलकार व ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ. श्री. पुरुषोत्तमजी दातकर तसेच संत तुकाराम महाराज मंदिर समिती (वाडेगांव) चे अध्यक्ष मा. डॉ. वासुदेवराव फाळके त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ मा. ॲड. श्री. विनोदजी फाटे आणि मर्चंट नेव्हीचे चीफ मा. कॅप्टन श्री. अतुलकुमार शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी समाजात शिक्षण, सहकार आणि आर्थिक सुबत्ता कशी आणता येईल, यावर आपले विचार मांडले. प्रमुख उपस्थिती व संघटन मेळाव्याला संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ (अकोला जिल्हा) चे अध्यक्ष मा. श्री. सुभाषभाऊ दातकर, कुणबी समाज विकास मंडळ, शेगांवचे कोषाध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वरभाऊ इंगळे व झेनिथ स्कूल (सस्ती) चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संदीपभाऊ गावंडे सामाजिक कार्यकर्ते मा. श्री.ॲड. गोपालभाऊ आखरे, संत तुकाराम महाराज कुणबी समाज ज्येष्ठ मंडळ (उमरी-अकोला) चे अध्यक्ष मा. श्री. रामेश्वरभाऊ चांदणे तसेच अ.भा. कुणबी युवा मंच (अकोला जिल्हा) चे अध्यक्ष मा.श्री. माणिकराव शेळके आणि महानगर कर्मचारी संघ (अकोला) चे अध्यक्ष मा. श्री. योगेशजी मारवाडी, मा.श्री.गजाननराव खोटरे जनरल मॅनेजर निर्माण मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी अकोला. यांची प्रमुख उपस्थिती होती. मा.श्री.उमेशभाऊ थोरात कुटासा हमु.इंदौर, हे इंदौर वरुन आवर्जून दसरा मेळाव्या करीता आले होते.याप्रसंगी त्यांनी बाप-लेकीच्या नात्यातून सामाजिक संदेश देणारी आपली स्वरचित रचना सादर केली. अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील विविध मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व सदस्य यांनी एकत्र येत समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडवले. महिला शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महिला भगिनींची उपस्थिती. *रुक्मिणी कुणबी समाज महिला मंडळ, अकोलाच्या अध्यक्षा सौ. शोभाताई शेळके* यांच्या नेतृत्वात श्रीमती सुमनताई बालदाने, सौ. मायाताई डिवरे, सौ. मंदाताई थोटे, सौ. निलिमाताई घुंगळ, सौ. शुभांगीताई फाळके आणि सौ. वैष्णवीताई गावंडे यांच्यासह महिला मंडळाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले. कृतज्ञता आणि समारोप हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि आजीवन सभासदांनी अहोरात्र परिश्रम घेतले. आलेल्या सर्व समाज बांधवांचे विनीत म्हणून मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले, एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि समाजाच्या प्रगतीचा संकल्प सोडत या अविस्मरणीय स्नेहमिलन मेळाव्याची सांगता झाली, सूत्र संचालन ॲड.श्री गोपालभाऊ आखरे यांनी केले आणि यांनी मंडळा सोबत विविध विषयावर चर्चा करुन.. मंडळाच्या आजीवन सभासद मधुन तालुका समित्याच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील समाज जोडला जाईल..अशी पुष्टी केली, प्रास्ताविक मंडळाचे सचिव श्री. सुरेशभाऊ फाळके यांनी केले, तर आभारप्रदर्शन मंडळाचे संचालक श्री. दीपकभाऊ गावंडे यांनी केले. धन्यवाद
Event Photos
More Events
See all events- Took place

डॉक्टर व विधिज्ञ स्नेहसंमेलन सोहळा
- 09:30
- डॉ. सागरजी थोटे यांचे हॉस्पिटल, पाचवा माळा, राम नगर, अकोला.
डॉक्टर व विधिज्ञ स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमातून वैद्यकीय व कायदेविषयक क्षेत्रातील समाजबांधव एकत्र आले आणि स्नेह, एकोपा व सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
View details - Took place

व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर शेगाव येथे संपन्न झाले
- 10:30
- पांडुरंग कृपा मंगल कार्यालय शेगांव
विद्यार्थी, युवक आणि नवउद्योजकांना करिअर व व्यवसायाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणारे शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमातून उपस्थितांना व्यावसायिक क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास आणि करिअर नियोजनाबाबत उपयुक्त माहिती मिळाली.
View details - Took place

धु वर परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळा
- 10:00
- वै पुरुषोत्तम हरी गणेश पाटील नगरी, खामगाव रोड, रेल्वे स्टेशन जवळ, MECB बाजुला, शेगांव
वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणून विवाह जुळवणीसाठी योग्य संधी उपलब्ध करून देणारा विशेष उपक्रम. यानिमित्ताने वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
View details
