Soyarik home
Login
Akola committee
Photo of श्री. सुयोग रमेशराव उगले

श्री. सुयोग रमेशराव उगले

Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला

Designation
Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
Place
मु. पोस्ट वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला – 444502

About

श्री. सुयोग रमेशराव उगले (शिक्षण – M.Com., B.Ed.) हे जय गजानन कॉमर्स क्लासेस, वाडेगाव आणि क्रेडिट अकाउंटिंग सेंटर, वाडेगाव चे संचालक आहेत. श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे ते संचालक म्हणून कार्यरत असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.

Other committee members

See the full Akola committee
  • श्री.अनिल श्रीधरराव गावंडे

    H.S.C.

    • Place: मांजरी
    • Age 50
    • 35 years’ experience

    अध्यक्ष :- श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अकोला उपाध्यक्ष:- कर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर डाबकी रोड अकोला. कर्ता हनुमान मंडळाचे उपक्रम 1)25 वर्षांपासून दरवर्षी वारकरी सांप्रदाय विचार धारेची परंपरा दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी 5 पाच वाजता भव्य काकडा आरती प्रभात फेरी, 2)भागवत सप्ताहाचे आयोजन, 3)संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण, 4) श्री.ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. 5)श्रावण महिन्यात दर सोमवारी महाआरतीचे आयोजन, 6)वृक्षारोपण, 7)रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, 8) मंडळामार्फत आदर्श विवाहाचे आयोजन.विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमात सहभाग. सामाजिक व समाजकार्याची 35 वर्षा पासुन आवड, विविध सामाजिक संस्थे मार्फत पुरस्कार आणि सत्का

  • श्री. राजेंद्र वामनराव काळणे

    Vice President – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला

    • Place: मु. पोस्ट आगर, ता. अकोला, जि. अकोला – 444006

    श्री. राजेंद्र वामनराव काळणे हे शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेले अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत. जनता एज्युकेशन सोसायटी, आगर येथे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देत आहेत. तसेच सेवा सहकारी सोसायटी, आगर येथे अध्यक्ष आणि तालुका खरेदी-विक्री संघ, अकोला येथे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून समाजाची एकजूट, शैक्षणिक प्रगती, सामाजिक विकास आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्यासाठी योगदान देत आहेत. विविध संस्थांमधील त्यांचा अनुभव आणि संघटनात्मक कार्य समाजासाठी उपयुक्त ठरत आहे.

  • श्री देविदासजी श्रीधरराव म्हैसने

    सेवानिवृत्त व्यवस्थापक

    • Place: नांदखेड

    श्री. देविदासजी श्रीधरराव म्हैसने हे सहकार क्षेत्रातील अनुभवी, कार्यतत्पर आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला येथे व्यवस्थापक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्ती घेतली आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाची तळमळ यातून त्यांनी नांदखेडसारख्या ग्रामीण भागातील छोट्याशा गावात श्री विठ्ठल ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. त्यांच्या पुढाकारातून उभी राहिलेली ही पतसंस्था आज आर्थिक प्रगतीचे उल्लेखनीय उदाहरण ठरली असून, संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे साडेआठ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळवून देणे आणि सहकाराच्या माध्यमातून गावाचा विकास साधणे यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सध्या ते श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.