
श्री देविदासजी श्रीधरराव म्हैसने
सेवानिवृत्त व्यवस्थापक
- Designation
- सेवानिवृत्त व्यवस्थापक
- Place
- नांदखेड
About
श्री. देविदासजी श्रीधरराव म्हैसने हे सहकार क्षेत्रातील अनुभवी, कार्यतत्पर आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला येथे व्यवस्थापक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्ती घेतली आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाची तळमळ यातून त्यांनी नांदखेडसारख्या ग्रामीण भागातील छोट्याशा गावात श्री विठ्ठल ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. त्यांच्या पुढाकारातून उभी राहिलेली ही पतसंस्था आज आर्थिक प्रगतीचे उल्लेखनीय उदाहरण ठरली असून, संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे साडेआठ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळवून देणे आणि सहकाराच्या माध्यमातून गावाचा विकास साधणे यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सध्या ते श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.



